माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चिपळूणच्या दौऱ्यावर येत असून रविवार दिनांक २२ आणि सोमवार दिनांक २३ रोजी असे दोन दिवस ते चिपळूण येथे तळ ठोकणार आहेत. यावेळी काही प्रकल्पांना ते भेटी देणार असून काही महत्वाच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत. यामध्ये सोमवार दिनांक २३ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण बहादूरशेख येथील सावरकर मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला संगमेश्वर-चिपळूणसह जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच मित्र पक्षांचे नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सरचिटणीस तथा रत्नागिरी जिल्हा पक्ष निरीक्षक बबनराव कनावजे चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, कुमार शेट्ये, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्यासह आदी उपस्थित होते.