banner 728x250

रत्नागिरीत रविवार २२ सप्टेंबर रोजी संभाजीराव भिडे यांचे व्याख्यान

banner 120x600
banner 468x60

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांचे रविवारी (ता. २२) रत्नागिरीत व्याख्यान व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम, धर्मवीर बलिदान मास अशा अनेक उपक्रमातून भिडे गुरूजी गेली पाच दशके समाजजागृतीचे कार्य करत आहेत. दुर्गामाता दौड व सुवर्ण सिंहासन खडा पहारा या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. श्रीमान रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना करण्याचा संकल्प २०१७ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या लाखो धारकऱ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसातच श्रीमान रायगडावरील श्री सुवर्ण सिंहासन व तद्नंतर खडा पहारा देण्यासाठी धारकरी प्रत्येक तालुक्यातून एक दिवस हजारोंची एक फळी दरदिवशी जाणार आहे. पहारा नियोजन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्य, दुर्गामाता दौड या अनुषंगाने संभाजी भिडे गुरूजी मार्गदर्शन करणार आहेत. सर्व धारकरी हिंदुत्ववादी धर्माभिमानी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गणेश गायकवाड यांनी केले आहे.

banner 325x300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *