लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ लोकांना आता नवी सुविधा मिळणार आहे. लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. लकवरच लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई हायकोर्टात याबाबत माहिती दिली. येत्या दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना मुंबई लोकलमध्ये ही विशेष सेवा मिळणार आहे. लोकलमधील एका मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यामध्ये करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. त्यामुले ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.