खेड – येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या साहिल सोंडकर या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प 2024 साठी निवड झाली होती. साहिल हा एस.वाय.आय.टी. मध्ये शिकत आहे. या निवडीसाठी त्याला 7 विविध चाचण्यांमधून जावे लागले होते, त्यानंतर त्याची ही निवड करण्यात आली होती. नुकतेच त्याने दिल्ली येथे जाऊन यशस्वीपणे हा कॅम्प पूर्ण केला आहे.
हा कॅम्प कोणत्याही छात्रासाठी सर्वात कठीण मानला जातो आणि अशा कॅम्प मध्ये निवड होणे ही एक फार मोठी संधी मानली जाते. ऑब्स्ट्रॅकल ट्रेनिंग, फायरिंग, मॅप रीडिंग यासारख्या गोष्टी तेथे शिकवल्या जातात व एकूणच व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. या कॅम्पमध्ये आर्मी विषयक विविध प्रकारची माहिती दिली जाते. त्याने हा कॅम्प यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍड.आनंदराव भोसले यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. सहजीवन शिक्षण संस्था व महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या प्रो.डॉ.अनिता आवटी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आय.सी.एस.च्या साहिल सोंडकरने केला ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प पूर्ण
Read Also
Recommendation for You
▪️भरणे येथील श्री देवी काळकाई मातेला दिली जाते शासकीय सलामी ▪️विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे…
🔹स्टार कोकण न्यूज🔹 ▪️रत्नदुर्ग शिवसृष्टीचे रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण ▪️ढोल,ताशे,तुतारीचा निनाद व…
स्टार कोकण न्यूज तुरंबवच्या श्री देवी शारदा देवीच्या दरबारात कुटूंबीय व ग्रामस्थांसह भास्कर जाधवांचे जाखडी…
▪️एस टी डेपो समोर झाला अपघात ▪️बाईक स्वाराला वाचवताना झाला अपघात ▪️रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गटारात…
▪️दोन्ही समाजाकडून करण्यात आली मध्यस्थी ▪️तायडे मारहाण प्रकरणी झाली दोन समाजाची महत्वपूर्ण बैठक ▪️दोघांकडून तक्रारी…